नवी दिल्ली: भारताच्या विदेश मंत्रालयाने सांगितले की, सूडान, दक्षिण सूडान, जिबूती आणि इरिट्रिया यांना 270 मेट्रीक टन खाद्य सहकार्य दिले जाईल. हे अफ्रिकी देश प्राकृतिक संकट आणि कोरोना महामारीमुळे प्रभावित झाले आहेत. भारतीय नौदलाचे जहाज ऐरावत मधून 24 ऑक्टोबर ला 155 मेट्रीक टन पीठ, 65 मेट्रीक टन तांदुळ आणि 50 मेट्रीक टन साखर पाठवण्यात आली. संकटावेळी अफ्रीकेमध्ये लोकांपर्यंत पोचण्याची भारताची परंपरा लक्षात घेवून, भारत सरकारने प्राकृतिक रुपाने प्रभावित लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी सूडान, दक्षिण सूडान, जिबूती आणि इरिट्रीया ला 270 मेट्रीक टन खाद्य सहकार्य प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
विदेश मंत्रालयाने सांगितले की, भारताने नेहमीच अफ्रीकेमध्ये देश आणि लोकांसह एकात्मतेने उभे राहून आणि विकास, क्षमता निर्माण आणि मानवीय सहायता कार्यक्रमांमध्ये भागिदारीही केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.