भारताकडून कोटा अंतर्गत अमेरिकेला साखर निर्यातीस तीन महिने मुदतवाढ

नवी दिल्ली : विदेश व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) अधिसूचनेनुसार, भारताने टेरिफ दर कोटा अंतर्गत अमेरिकेला कच्ची साखर निर्यातीची वैधता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे. आधी या टेरिफ दर कोटा अंतर्गत साखर निर्यातीची वैधता सप्टेंबर महिन्यात समाप्त होणार होती. टेरिफ दर कोटा अनिवार्य रुपात कमी शुल्कामद्ये निर्यातीस संधी देतो. एकदा ही मुदत समाप्त झाल्यानंतर अतिरिक्त शिपमेंटसाठी जादा टेरिफ लागू केले जाते.

डीजीएफटीने मे महिन्यात सांगितले होते की, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कोटा प्रणाली अंतर्गत अमेरिकेला एकूण साखर निर्यात १०,४७५ टन होईल. मे महिन्यात केंद्र सरकारने साखर हंगाम ऑक्टोबर २०२१-सप्टेंबर २२ यामध्ये देशांतर्गत उपलब्धता आणि दरात स्थिरता राखण्यासाठी एक जून २०२२ पासून १०० लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.

विदेश व्यापार महा संचालनालयाकडून (डीजीएफटी) जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एक जून २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ परयंत, साखर निर्यातीसाठी विशिष्ट स्थितीत अनुमती दिली जाईल. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, हा निर्णय २०२०-२१ मध्ये उच्चांकी साखर निर्यातीनंतर घेण्यात आला होता. हंगाम २०२०-२१ मध्ये ६० लाख मेट्रिक टनाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here