नवी दिल्ली :भारतामध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 83,883 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. यामुळे देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 38 लाखाच्यावर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून गु़रुवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 83,883 नवे रुग्ण समोर आले आहेत. हा आकडा एका दिवसातला आहे. दरम्यान, 1043 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर देशामध्ये कोरोनामुळे एकूण 67,376 रुग्ण मृत पावले आहेत.
आकड्यांनुसार, देशामध्ये रिकवरी रेट 77.08 टक्क्यावर पोचला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अॅक्टिव्ह रुग्णांची भागीदारी 21.16 टक्के आहे. मृत्यु दर 1.74 टक्के आहे तर पॉजिटिविटी रेट 7.15 टक्के आहे. गेल्या 24 तासात 68,584 रुग्ण बरे झाले आहेत. देशामध्ये आतापर्यंत एकूण 29,70,492 रुग्ण कोरोनाला मात देण्यात यशस्वी झाले आहेत. भारतात कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 8,15,538 इतकी आहे.
गेल्या 24 तासात आतापर्यंतच्या सर्वात मोठया संख्येने कोरोनारुग्ण समोर येण्याबरोबर सर्वात अधिक तपासण्याही झाल्या आहेत. गेल्या 24 तासात 11,72,179 तपासण्या झाल्या. आतापर्यंत एकूण 4,55,09,380 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत कोरोनामुळे प्रभावित असणारा तिसरा देश आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.