नवी दिल्ली: कोरोना वायरस संक्रमणाची प्रकरणे रोज वाढतच आहेत. भारतात गेल्या 24 तासात सर्वाधिक 45 हजार पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आढळले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. 23 जुलै च्या सकाळपर्यंत देशामध्ये गेल्या 24 तासात 45,720 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याबराबेरच आता देशामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखाच्या वर झाली आहे. इतकेच नाही तर, गेल्या 24 तासात सर्वाधिक 1,129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्युचा आकडा 29,861 वर पोचला आहे. कोरोना फैलावाची गती हिच राहिली तर 12 ते 13 लाखाचा आकडा पार करण्यास केवळ दोनच दिवस लागतील. आणि आपण शनिवारी (25 जुलै) सकाळी 13 लाखाचा आकडा पार केला असेल.
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) यांच्या नुसार 22 जुलैपर्यंत टेस्ट करण्यात आलेल्या कोरोनावायरस सँपलची एकूण संख्या 1,50,75,369 आहे, ज्यापैकी 3,50,823 सँपलची टेंस्ट गेल्या 24 तासात करण्यात आलेली आहे.
देशामध्ये कोरोना चे आतापर्यंत एकूण 12,38,635 पॉजिटिव रुग्ण आढळले आहेत. तर बर्या होणार्यांची संख्या 7,82,607 पर्यंत पोचली आहे. रिकवरी रेट बाबत बोलायचे झाल्यास आता 63.18 टक्क्यांपर्यंत रुग्ण रिकवर होत आहेत. तर पॉजिटिवीटी रेट 13.03 टक्के इतका आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.