गुंतवणुकीसाठी भारत सर्वात चांगले ठिकाण: पंतप्रधान

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारबरोबर वर्चुअल ग्लोबल इन्वेस्टर राउंडटेबल ला संबोधित केले. गुंतणवुकदारांना प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की, आत्मनिर्भर भारताकडे वाढण्याची इच्छा केवळ विजन नाही, तर योजनाबद्धतेने तयार करण्यात आलेले आर्थिक धोरण आहे. त्यांनी सांगितले की, भारत दीर्घकालिक गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले ठिकाण आहे.

त्यांनी सांगितले की, जर आपण विश्‍वासाने गुंतवणुकीवर पैसा कमावायचा असेल तर भारत हे एकच स्थान आहे. जर आपण टिकाउपणासह स्थिरता हवी असेल तर भारतच ही जागा आहे. जर तुम्हाला पर्यावरणाच्या सुरक्षेबरोबर आर्थिक वृद्धी हवी असेल तर भारतच योग्य आहे. त्यांनी हेदेखील सांगितले की, या वर्षी भारताने बहादुरीने जागतिक महामारीचा मुकाबला केला. जगाने भारताचे राष्ट्रीय चरित्र पाहिले. जगाने भारताची खरी ताकद पाहिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here