नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी आखून दिलेल्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी देशात उच्च क्षमतेचे कंटेनर निर्मितीची गरज आहे. त्यातून कंटेनरच्या कमतरतेचा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले. चांगल्या गुणवत्तेचे कंटेनर निर्मितीसाठी कोर्टेन ६ गुणवत्तेच्या स्टीलचे उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले.
स्वदेशी कंटेनर निर्मिती या विषयावरील एका वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री गोयल यांनी जीपीएसद्वारे स्वदेशी कंटेनरच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. चांगल्या क्षमेतेचे आणि तंत्रज्ञानाचा वापर भारतीय उद्योगाला गती देईल. भारतासारखा देश आता उच्च विकासमार्गावर आहे. मात्र, निर्यातीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सध्या कंटेनरच्या कमतरतेचा सामना करावा लागत असल्याचे मंत्री गोयल म्हणाले. ते म्हणाले, जशी मेक इन इंडिया ही योजना कार्यान्वित करण्यात आली, अशाच पद्धतीने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत कंटेनर्सची निर्मिती केली गेली तर रोजगार निर्मिती होईल. निर्यातही गतिमान होईल. याशिवाय परकीय चलनाचीही बचत होणार आहे.
सद्यस्थितीत कंटेनगर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे (कॉन्कॉर) ३७००० आयएसओ मानांकित कंटेनर आहेत. यापूर्वी भारताला चीनने निर्मिती केलेल्या कंटेनरमधून आयातीसाठीही अवलंबून राहावे लागत होते.