भारताची रशियाकडून 9 दशलक्ष टन गहू आयात करण्याची योजना : रिपोर्ट

नवी दिल्ली : देशांतर्गत साठा वाढवण्यासाठी भारत रशियाकडून 9 दशलक्ष टन गहू आयात करण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, भारतात गव्हाची घाऊक किंमत ऑगस्टमध्ये 6.2 टक्क्यांनी वाढून 2,633 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वी देशांतर्गत बाजारात गव्हाची किमत प्रति क्विंटल 2,480 रुपये होती.

देशांतर्गत उत्पादन कमी होण्याच्या चिंतेने सरकारने साठवणुकीची मर्यादा लादल्यानंतर आणि खुल्या बाजारात व्यापाऱ्यांना धान्य विकल्यानंतर गव्हाच्या किंमती वाढत आहेत. कमी उत्पादन, घटणारा साठा आणि वाढती मागणी यामुळे गव्हाच्या किमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने 2023 मध्ये देशात गव्हाचे विक्रमी 112.7 दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु व्यापाऱ्यांच्या मतानुसार, देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम मैदानी भागात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाचे उत्पादन 101-103 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत एका लेखी उत्तरात ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, गव्हाच्या किरकोळ किमती सतत बदलत आहेत आणि सरकार किमतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here