नवी दिल्ली: भारत कायमच इतर देशांच्या मदतीसाठी पुढे राहिला आहे. भारताने लेबनान च्या बेरुत मध्ये झालेल्या स्फोटानंतर या देशासाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने बेरुत मध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनान ला भारतीय वायु सेना सी-17 विमानातून उपचार, साखर आणि खाद्य पुरवठ्यासह 58 मेट्रीक टन दिलासा सामग्री पाठवली आहे. बेरुन स्फोटामध्ये 150 पेक्षा अधिक लोक मृत्यु पावले आणि अनेक बेघर झाले आहेत. ईएएम चे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांच्यानुसार, लेबनान च्या सरकारी अधिकार्यांच्या उपस्थितीत भारतीय राजदूत सुहेल अजाज खान यांना सामग्री मिळाली.
सामग्री मिळाल्यानंतर राजदूत खान यांनी ट्वीट केले की, भारत, लेबनान चा विश्वासु मित्र आहे. श्रीवास्तव म्हणाले की, या खेपेमध्ये आपत्कालीन उपचार सामग्री , गव्हाचे पीठ , साखर आणि डाळी यांचा समावेश आहे, तसेच ब्लॅंकेट, स्लीपिंक मॅट सारख्या वस्तूही आहेत. ज्यांची मोठ्या प्रमणात बेघर झालेल्या लोकांना आवश्यकता आहे. लेबनान मध्ये कोरोनाचाही हाहाकार आहे, ज्यामुळे भारताने पीपीई कीट पाठवण्याचीही व्यवस्था केली आहे, ज्यामध्ये सर्जिकल ग्लोव्हज आणि सर्जिकल गाउन यांचा समावेश आहे.
लेबनान मध्ये स्फोटानंतर अनेक लोक बेघर झाले आहेत, ज्यांना या मदतीची गरज होती. या स्फोटामध्ये 170 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला होता. आणि 6000 लोक जखमी झाले होते, तर जवळपास तीन लाख लोक बेघर झाले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.