हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनी मंडी
अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी साखर कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट देण्यात आले. मात्र, त्यातील केवळ ३५ लाख टन साखरच निर्यात होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतातून २१ लाख ७४ हजार १६९ टन साखरेचे करार झाले आहेत. त्यातील जवळपास १७ लाख टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. येत्या काही दिवसांत साखर निर्यातीचे आणखी करार होणार असून, हंगामात एकूण ३५ लाख टन साखर निर्यात होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. देशात यंदाही साखरेचे उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशाच्या बाजारपेठेची गरज २६० लाख टन असताना देशात ३२५ टन साखर उप्तादन झाले होते. यंदाही असेच भरगोस उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा देशातील अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्राने साखर कारखान्यांना निर्यातीचा कोटा निश्चित करून दिला आणि जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याचे टार्गेट देण्यात आले. देशातील एकूण कारखान्यांना मिळून ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट आहे. या टार्गेटमुळे तोटा सहन करूनही कारखाने निर्यात करण्याच्या तयारीत आहेत.
कारखान्यांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत १७ लाख ४४ हजार टन साखर प्रत्यक्ष विदेशात गेली आहे. जवळपास ५० देशांना निर्यात होत आहे. बांगलादेश, श्रीलंका या शेजारी देशांबरोबरच इराण, सोमालिया, सुदान या देशांना प्रामुख्याने साखर विक्री निर्यात होत आहे. निर्यात झालेल्या साखरेमध्ये सुमारे आठ लाख टन साखर कच्ची आणि नऊ लाख टन साखर पांढरी (व्हाईट) आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp