नवी दिल्ली : भारत यावर्षी आपले साखर निर्यातीचे उद्दीष्टपूर्तीसाठी तयार आहे. मात्र, शिपमेंटच्या उशीरासह इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत बलरामपूर साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पटवारी यांनी सांगितले की, अडचणी समोर असल्या तरी भारत यावर्षी ५-६ मिलियन टन साखर निर्यातीचे आपले उद्दीष्ट पूर्ण करू शकेल.
सीएनबीसी टीव्ही १८ला दिलेल्या मुलाखतीत सीईओ पटवारी यांनी सांगितले की, कंटेनरच्या तुटवड्याने मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, आम्ही गेल्यावर्षीही पाहिले आहे की, कोरोनाच्या काळातही साखर उद्योगाने आपला ६ मिलियन टनाचा निर्यातीचा कोटा पूर्ण केला आहे.
पटवारी म्हणाले, ब्राझिलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाल्याने जागतिक स्तरावर साखरेचा दर १४ ते १७ सेंटने अधिक आहे. ब्राझिलने उन्हाळ्याच्या काळात अतिशय कठीण स्थितीचा सामना केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर अधिक चांगले राहतील अशी शक्यता आहे. क्रूड तेलाचे दरही चढेच आहेत. त्यामुळे पुढील वर्षी ब्राझिलमध्ये उसाचे उत्पादन किती होईल याविषयी साशंकता आहे. ही स्थिती कायम राहीली तर साखरेचा दर चांगले राहतील.
आम्हाला अपेक्षा आहे की आगामी दहा ते पंधरा दिवसांत साखरेचे दर वाढतील. देशांतर्गत साखरेचे दर वाढतील अशी शक्यता आहे. आगामी दहा ते पंधरा दिवसांत साखरेचे दर वाढतील असे पटवारी यांनी सांगितले.