इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भारत इथेनॉल उत्पादन वाढवणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले. यामुळेच भारताने इथेनॉलच्या उत्पादनावर भर दिला आहे असे ते म्हणाले. ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित एका परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले, ब्राझील, कॅनडा, अमेरिकेने फ्लेक्स फ्यूएल इंजिनाचे उत्पादन करून ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल अथवा १०० टक्के बायो इथेनॉलचा वापर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने आम्ही इथेनॉल उत्पादन वाढविले आहे असे गडकरी यांनी सांगितले.
गेल्या काही आठवड्यात सातत्याने झालेल्या इंधन दरवाढीनंतर मुंबई, हैदराबादसह अनेक शहरांत पेट्रोलचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि लडाखमध्येही पेट्रोल १०० रुपयांपेक्षा अधिक दराने विकले जात आहे.

मंत्री गडकरी म्हणाले, जगभरात रेसिंग कार्समध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर केला जातो. प्रदूषणात कपात आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दीष्ट २०२५ करण्यात आले आहे. आधीच्या सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले होते. सध्या पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते असे गडकरी म्हणाले. इथेनॉलची खरेदी ३८ कोटी रुपयांवरुन ३२० कोटींवर पोहोचली आहे.

भारत आठ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेय आयात करतो. पुढील चार – पाच वर्षात यात दुप्पट वाढ होऊन अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल असे सांगून गडकरी म्हणाले, आम्ही पाच वर्षात २ लाख कोटी रुपयांची इथेनॉल इकॉनॉमी उभारणार आहोत. खराब धान्याचा यात वापर केला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here