मुंबई: “पुढील दोन आठवड्यांमध्ये सरासरी पाऊसापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.” असे इंडिया मेटोरोलॉजीकल विभागातील हवामान संशोधन विभागातील ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मान्सून सरासरी 35 टक्क्यांनी कमी झाला होता, त्यामुळे पिकांच्या उत्पादनाची चिंता वाढली आहे.
१ जून ला मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून देशात सरासरीपेक्षा 17 टक्के कमी पाऊस झाला आहे, परंतु कापूस आणि शेंगदाण्याचे सर्वात मोठे उत्पादक राज्य म्हणून गुजरातमध्ये पावसाची तूट 42 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
एडेलवेस रूरल अँड कॉरपोरेट सर्व्हिसेस लिमिटेडच्या संशोधन विभागाचे प्रमुख प्रेरणा देसाई यांनी सांगितले की, बऱ्याच भागात पेरणीस उशीर झाला आहे, परंतु पुढील काही दिवसात चांगल्या पावसामुळे पेरणी वाढू शकते.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांनी 19 जुलैपर्यंत 56.7 दशलक्ष हेक्टरवर पिकांची पेरणी केली आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे भारतात पिकांचे नुकसान झाले, मुख्य जलाशयातील पाण्याची पातळी त्यांच्या स्टोरेज क्षमतेच्या 24 टक्के होती, गेल्या वर्षी याच काळात ती 32 टक्के होती, असे सरकारी आकडेवारीत दिसून आले आहे. आयएमडीने 2019 मध्ये सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला आहे. खाजगी फॉर्मास्टर स्काईमेटने नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.