बिजिंग : चीनी मंडी
भारत आणि चीन यांच्यातील व्यापार तूट दूर करण्यासाठीचे प्रयत्न दोन्ही देशांकडून सुरू आहेत. यात भारताने चीनला, आणखी भारतीय माल आयात करण्याविषयी आग्रह धरला आहे. साखर, तांदूळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी भारतातून करावी, असे भारताचे म्हणणे आहे. या संदर्भात दोन्ही देशांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बिजिंगमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे.
भारताचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान सध्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांची चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपाध्यक्ष वांग शौवेन यांच्याशी चर्चा झाली. तसेच चीनच्या कस्टम विभाग प्रशासनाचे राज्यमंत्री झँग जिवेन यांच्याशीही वाधवान यांनी चर्चा केली आहे. भारताच्या कृषी आणि कृषी उत्पादनांची तपासणी करून ती बाजारात आणण्याची जबाबदारी जिवेन यांच्याकडे आहे. त्यामुळे वाधवान यांच्या दोन्ही बैठका अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. दोन्ही देशांमध्ये २०१७ मध्ये ९ हजार ५०० कोटी डॉलरची उलाढाल झाली होती. तर, २०१८मध्ये व्यापार तूट ५ हजार १०० रुपयांवरून ५ हजार ७०० कोटी अमेरिकी डॉलरपर्यंत गेली आहे.
२०१७च्या तुलनेत भारताची चीनला निर्यात १५.२ टक्क्यांनी वाढली असून, १ हजार ८०० कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी चीनने विदेशी औषधांसाठी दरवाजे खुले केले आहे. विशेषतः कॅन्सरविषयीच्या औषधांना बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील औषधांना आता चीनची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भारतीय औषधे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादने आयात करण्याच्या चीनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बिजिंगमधील बैठकांमध्ये वाधवान यांनी चीनकडून या संदर्भात आणखी ठोस पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जेणेकरून भारताची चीनला निर्यात वाढेल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादने, औषधे यांच्या बरोबरच भारतात साखर, तांदूळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे चीनच्या बाजारपेठेसाठी भारत एक विश्वासार्ह पुरवठादार होऊ शकतो, असा मुद्दाही वाधवान यांनी मांडला आहे.
आशिया खंडातील ब्रुनी, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलिपिन्स, लाओस, व्हिएतनाम या देशांनी फ्री ट्रेड करार केला आहे. त्यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देशही त्या कराराचे भागीदार आहेत.
या रिजनल कॉम्प्रिहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशीपचे (आरईसीपी) भारताचे प्रमुख शुधांशू पांडे यांनी चीनचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाणिज्य विभागाचे उपसंचालक यंग झेंगविई यांच्याशी चर्चा केली. अमेरिकेने चीनशी व्यापार संबंध तोडल्यानंतर चीनने ‘आरईसीपी’ला प्रमोट करायला सुरुवात केली आहे.
जगाच्या ४५ टक्के लोकसंख्या आणि जगाच्या एकूण जीडीपीच्या ३० टक्के जीडीपी असलेल्या असलेल्या आशिया खंडासाठी ‘आरईसीपी’ करार महत्त्वाचा आहे.
त्यामुळे भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा ही ‘आरईसीपी’ कराराभोवतीच झाली आहे. यात माला बरोबरच सेवा आणि गुंतवणुकीचा विषयही चर्चेत आला आहे. या दरम्यान झालेल्या चर्चेत भारताने चीनला तंबाखू निर्यात करण्याच्या करारावर चर्चा केली. वुहान परिषदेनंतर दोन्ही देशांमध्ये बासमती तांदूळ, मासे, माशांचे तेल यांच्या देवाण-घेवाणीचे करार झाले आहेत.
याचा बाजारपेठेवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसत आहे. दरम्यान, भारतीय भेंडी, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, यांना चीनने बाजारपेठ खुली करून द्यावी, असे आवाहन वाधवान यांनी चीनला केले आहे.
डाउनलोड करे चिनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp