भारताला २०२५ पर्यंत जेट इंधनामध्ये १ टक्के मिश्रण मिळविण्यासाठी दरवर्षी १४ कोटी लिटर SAF ची गरज

भारताला २०२५ पर्यंत जेट इंधनामध्ये १% मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दरवर्षी सुमारे १४० दशलक्ष लिटर शाश्वत विमान इंधन (SAF) ची आवश्यकता असेल, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शुक्रवारी सांगितले.

ते म्हणाले की, २०२५ पर्यंत जर आम्ही जेट इंधनामध्ये ०१ टक्के एसएएफ मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले तर भारताला प्रती वर्षी जवळपास १४ कोटी लिटर SAF ची गरज भासेल. ते म्हणाले की, जर जादा महत्त्वाकांक्षा ठेवून ०५ टक्के एसएएफ मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित केले तर भारताला दरवर्षी ७० कोटी लिटर एसएएफची गरज भासेल.

मंत्र्यांनी, पंतप्रधानांनी स्पष्टपणे मांडलेल्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने २०४७ पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, पंतप्रधानांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी पेट्रोलियम क्षेत्राचे मोठे योगदान असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरी काल नवी दिल्लीत उद्योग आणि प्रसारमाध्यमांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन उपस्थित होते.

नागरी उड्डाण क्षेत्राला डीकार्बोनाइज करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करताना, स्वदेशी उत्पादित शाश्वत विमान इंधन (SAF) मिश्रणाचा वापर करून देशातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाण काल यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागीदारीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पुरवलेल्या SAF मिश्रित एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) ने पुण्याहून दिल्लीला एअर एशिया फ्लाइट (i5 767) ने उड्डाण केले. हरदीप सिंग पुरी यांनी या विशेष विमानाचे विमानतळावर स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here