जोधपुर: चीनि मंडी
भारतीय हवाई दलाचे मिग-२७ बनावटीचे विमान राजस्थानमधील जोधपुरजवळ बानाड भागातील देवालीया गावात कोसळले. या अपघातातून वैमानिक सुखरूप बचावला.
हवाई दलाचे प्रवक्ता कर्नल सोम्बित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान मोकळ्या जागेत कोसळले आणि त्या परिसरात आग लागली. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोचले आणि विमानाच्या आगीवर नियंत्रण मिळवले. विमानात अचानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाने योग्य वेळी विमान रिकाम्या जागेत उतरवले.
या घटनेचे साक्षीदार चंपालाल म्हणाले कि आकाशात तीन विमाने फिरत होती आणि अचानक एका विमानातून धूर येवू लागला व ते विमान जमिनीवर कोसळले.
वैमानिकाला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले.
“या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. हवाई दलाच्या सरावावेळी हे विमान कोसळले आहे,” घोष म्हणाले.
जोधपूरचे उपयुक्त अमनदीप सिंघ म्हणाले कि या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासन आहे पोलीस यंत्रणा जागेवर पोचली आहे.