नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतीय हवाई दल लवकरच इथेनॉल मिश्रित इंधन वापराला सुरुवात करणार आहे. प्रमुख्याने अँटोनोव्ह-३२ सारख्या वाहतूक करणाऱ्या हवाई दलाच्या विमानांसाठी हे इंधन वापरण्यात येणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापर वाढवण्यासाठी केलेल्या आवाहनाला हवाईदलाकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
ऑगस्ट महिन्यात दिल्ली-डेहराडून या हवाई मार्गावर ७२ प्रवाशांचे नागरी विमान जैव इंधनावर चालवण्यात आले. देशाच्या हवाई क्षेत्रात पर्यायी इंधन वापराचा सुरू होण्याची ही सुरुवात होती.
भारतातील विमानसेवा २५ टक्के जैवइंधन आणि ७५ टक्के एअर टर्बाईन इंधनावर चालते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत नुकतीच एक घोषणा केली होती. त्यात १० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन वापराचे धेय्य साकार करण्यासाठी १२ बायो-रिफायनरी उभारण्यात येत असल्याचे सांगितले होते.
भारत सरकारने मे महिन्यात इथेनॉल उत्पादनासाठी मार्ग खुला केला आहे. त्यामध्ये उसाच्या रसाबरोबरच साखरेचा अर्क असलेल्या बीट, कॉर्न, खराब झालेला गहू, बारीक भात, तसेच खाण्या अयोग्य बटाटा यांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यास अनुमती देण्यात आली आहे.