भारतीय बासमती तांदळाचा स्वाद जगभरात पसरला आहे. यावेळी गेल्यावर्षीच्या तुलनेत उच्चांकी ४५.६ लाख टन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये ३८,५२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. चांगला दर मिळाल्याने निर्यातदार आणि शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत. देशातील एकमेव बासमती निर्यात विकास प्रतिष्ठान (बीईडीएफ) मोदीपुरम येथे आहे. बीईडीएफच्या अलिकडच्या अहवालानुसार, यावर्षी बासमतीच्या निर्यातीने परकीय चलन मिळवण्यात उच्चांक गाठला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, परदेशात बासमतीची चमक वाढत आहे. येथील लोकही बासमतीला पसंती मिळत आहे. जगभरातील १५० देशांमध्ये यावर्षी सर्वाधिक ४५.६ लाख टन बासमतीची निर्यात केली आहे. चांगल्या परिणामांमुळे बीईडीएफचे संशोधक बासमती तांदळाबाबत निर्यातीसाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जागरुकता करीत आहेत. बासमती निर्यात विकास प्रतिष्ठानचे प्रभारी तथा मुख्य संशोधक डॉ. रितेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, बासमती तांदूळ सौदी अरेबिया, ईराक, ईराण, कुवेत, ओमान, तुर्की, कॅनडा, बेल्जियम, इटली, फ्रान्स, मलेशिया, सीरिया, साऊथ आफ्रिका, अल्जेरिया, न्युझीलंड, पोर्तुगाल, स्वीडन, जर्मनी, इस्राइल, बहारीन, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, नेदरलँड, लेबनॉन, सिंगापूर, जपान, रशियन यांसह १५० देशात बासमतीची निर्यात झाली आहे.