भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षाही अधिक गतीने रिकवरी केली आहे, हा दावा भारतीय रिजर्व बँक चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला. गुरुवारी फॉरेन एक्सचेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या वर्च्युअल वार्शिक कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, इकोनॉमी च्या गतीने रिकवरी ला कायम ठेवण्यासाठी फेस्टिवल हंगाम संपल्यानंतर प्रॉडक्टस आणि सर्विसेस ची मागणी कायम ठेवण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले, कोरोनामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्था अधिक खाली जाण्याची भिती आहे आणि हा धोका भारतीय अर्थव्यवस्थेवरही आहे. यासाठी इकोनॉमिक वाढीतील गतीला कायम ठेवण्यासाठी मागणी मध्ये स्थिरता खूपच गरजेची आहे.
शक्तिकांत दास म्हणाले, आरबीआय च्या रेगुलेटरी रिफॉर्म मुळे फायनॅन्सियल मार्केटस ने नवी उडी घेतली आहे. भारत पूंजी खाता परिवर्तनीयतेला एका घटनेऐवजी एका प्रक्रियेच्या रुपामध्ये पाहण्याची दृष्टी कायम ठेवेल. त्यांनी सांगितले की, भारताच्या इकोनॉमिक ग्रोथचे आउटलुक चांगले झाले आहे, पण यूरोप आणि भारताच्या काही भागामध्ये कोरोना चा फैलाव पुन्हा झाल्याने ग्रोथमध्ये घट येण्याची भिती कायम आहे.