सुवा : फिजीमधील साखर कारखान्यांमधील तांत्रिक दोष ओळखण्यासाठी भारतातील सात अभियंत्यांना पाचारण करण्यात आले आहे. भारतातील हे अभियंते साखर कारखान्यांतील त्रुटींचा अभ्यास करून त्याचा अहवाल फिजी सरकारच्या साखर मंत्रालयाला देणार आहेत. यासाठी साखर मंत्रालयाने सुमारे १,००,००० डॉलर खर्च केले आहेत. याबाबत साखर मंत्री चरण जेठ सिंह म्हणाले की, अभियंत्यांनी दिलेल्या सेवांपेक्षा त्यांचासाठी केलेला खर्च खूपच कमी आहे.
मंत्री चरण जेठ सिंह म्हणाले, हे इंजिनीअर आपल्याकडे असलेल्या उपकरणांची आणि मशीनची तपासणी करण्यासाठी पुढील १० दिवस येथे असतील आणि आम्हाला यावर्षीच्या गाळप हंगामाची तयारी करण्यास मदत करतील. विविध साखर कारखान्यांमध्ये काय करावे लागेल ? याचा अहवाल ते आपल्याला देतील. यामुळे फिजीचा साखर उद्योग आधुनिक होण्यास मदत मिळणार आहे.