भारतीय हायड्रोकार्बन उद्योग विकासाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

भारतीय हायड्रोकार्बन उद्योग विकासाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. त्याशिवाय, आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही, आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7.2% आर्थिक विकास दर, भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता दर्शवत आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. ते काल संध्याकाळी, फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (FIPI), अर्थात भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघ तेल आणि वायू पुरस्कार-2022 निमित्त आयोजित समारंभात नेते, नवोन्मेषी, माध्यम कर्मचारी आणि तेल आणि वायू उद्योगातील अग्रणी यांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कामगार अन रोजगार राज्य मंत्री रामेश्वर तेली, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन देखील यावेळी उपस्थित होते.

भारतीय तेल आणि वायू कंपन्यांनी हाती घेतलेल्या नूतन स्वच्छ ऊर्जा उपक्रमांचा पुरस्कार केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी फिपी (FIPI) ची प्रशंसा केली. ते म्हणाले, “फिपी (FIPI) पुरस्कार समारंभाला उपस्थित राहण्याची माझी ही दुसरी वेळ आहे. यंदा फिपी च्या विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रबंधांसह, पुरस्कारांच्या विशेष श्रेणीमधील वीस पेक्षा जास्त पुरस्कार, नूतन ऊर्जा या विषयावर आधारित आहेत, याबद्दल मला आनंद वाटत आहे. माजी सचिव यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांमधील प्रख्यात शास्त्रज्ञ, यांचा समावेश असलेल्या मूल्यमापन समितीच्या भव्यतेवरून, पुरस्कारांचे महत्व दिसून येते.

या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सर्व सहभागींना त्यांच्या संबंधित क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करायला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे व्यासपीठ उपलब्ध देणे, हे फिपी तेल आणि वायू पुरस्कारांचे प्रयोजन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, फिपी तेल आणि वायू पुरस्कार हे भारतीय तेल आणि वायू उद्योगासाठी सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणून उदयाला आले आहेत. पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये, सर्वोत्कृष्ट नवोन्मेषासाठी वैयक्तिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला अधिकारी, संशोधन आणि उत्पादन, तेल शुद्धीकरण, विपणन, डीजीटायझेशन आणि शाश्वतता या क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी यंग अचिव्हर ऑफ द इयर पुरस्कार, या पुरस्कारांचा समावेश असून, हे सर्व महत्वाचे पैलू एकत्रितपणे तेल आणि वायू उद्योगाचा विकास प्रदर्शित करतात.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here