पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर अति विनाशकारी चक्रीवादळात झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
नौदलाच्या पश्चिम विभागातील चार युद्धनौका, अन्न पाकिटे, पाणी, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गुजरात नौदल विभागातही नौदल आणीबाणी सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच नौदलाची जहाजे आणि हेलिकॉप्टरही हवाई पाहणी आणि बचावकार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
5 नोव्हेंबर 2019 ला दुपारपर्यंत ‘महा’चक्रीवादळ वळून गुजरात किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. 6 नोव्हेंबर 2019 च्या रात्रीपर्यंत हे चक्रीवादळ वेरावळजवळ समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 35 ते 40 कि.मी. वेगाने वारे वाहतील. पूर्वमध्य अरबी समुद्र खवळलेला राहील तसेच दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातही गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
(Source: PIB)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.