कमी उत्पादनामुळे ब्राझीलने गमावलेल्या बाजारपेठेवर ताबा मिळवताना भारतीय साखरेने इजिप्तच्या बाजारपेठेत आपली छाप उमटविली आहे. अनेक दशकांनंतर भारताकडून इजिप्त साखर खरेदी करत आहे. आतापर्यंत तेथे ब्राझीलकडून साखर पुरवठा केला जात होता.
द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इजिप्त आंतरराष्ट्रीय व्यापारी फर्मच्या माध्यमातून भारतीय साखर खरेदी करत आहे. बल्क लॉजिक्सचे संचालक विद्या सागर व्ही. आर. यांनी सांगितले की इजिप्त भारताकडून सफेद आणि कच्ची साखर खरेदी करत आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, व्यापारी एजन्सींकडून गेल्या महिन्यात इजिप्तला १५,००० टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये कमी उत्पादन आणि देशांतर्गत खपात झालेल्या सुधारणेमुळे तोट्याचा सामना करीत असलेल्या जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेची मागणी सातत्याने वाढत
इजिप्तशिवाय, जिबूतीलाही भारतीय साखर निर्यात केली जात आहे. जिबूतीहून भारतीय साखर इथिओपियाला जाते. दर महिन्याला किमान २५०००-३०००० टन साखर या विभागात पाठवली जात आहे.