मुंबई : अतिरिक्त उत्पादन आणि साखर साठा या समस्येशी लढणार्या साखर उद्योगासमोर कोरोनाने नवे संकट उभे केले आहे. अलीकडेच केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने सूचित केले आहे की, साखर कारखान्यांना अतिरिक्त साठ उत्पादन आणि साखर साठा याला नियंत्रीत करण्यासाठी अतिरिक्त ऊसाला इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट करणे आवश्यक आहे. अतिरिक्त साखर साठ्यामुळे साखरेच्या एक्स मिल किमतींवर सातत्याने दबाव दिसत आहे.
चीनी मंडी न्यूजशी बोलताना द शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, कोरोना ने जागतिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम केला आहे. साखर उद्योगही यापासून लांब नाही. भविष्यामध्ये अधिक अव्हानांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जेव्हा लॉकडाउन होता, तेव्हापासून पूर्ण भारतामध्ये साखर कारखाने आवश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत काम करत होते. या दरम्यान, कारखान्यांकडून साखर/इथेनॉलची कोणतीही देवाणघेवाण झालेली नाही. यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखर साठ्याशी सामना करावा लागत आहे. यामुळे ऊस थकबाकी देखील वाढत आहे.
त्यांनी सांगितले की, ऊसाच्या अतिरिक्त उत्पादनाला इथेनॉल उत्पादनात बदलण्यासाठी भारत सरकारच्या विचारांचे पूर्णपणे समर्थन करतो, कारण यामुळे केवळ बजारातील अतिरिक्त साखर कमी होणार नाही तर, कारखान्यांच्या तरलतेमध्येही सुधारणा होईल. भारताच्या बायोफ्यूल उपक्रमाची सफलता गतीशील उत्पादन क्षमतांवर अवलंबून असेल. बायोफ्यूल अंतर्गत आम्हाला आताही एक मोठा पल्ला निश्चित करावा लागणार आहे आणि वर्ष 2022 पर्यंत 10 टक्के संमिश्रण प्राप्त करणार आहे. आतापर्यंत सरकारकडून निर्धरित 9 बिलियन लीटल च्या तुलनेत 2019-20 मध्ये केवळ 3.55 बिलियन लीटर इथेनॉल चे उत्पादन करण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, यावर्षी ब्राझील च्या इथेनॉल वरुन साखर उत्पादनाकडे वाढलेला कल दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरामध्ये घट झाल्यामुळे इथेनॉलचे उत्पादन ब्राझीलसाठी व्यवहार्य नाही. ब्राझीलकडून साखर उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेवटी विश्वस्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त साखर उत्पादन होवू शकते. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किमंतीवर परिणाम होवू शकतो. साखरेची निर्यातही पुढच्या वर्षी आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. ब्राझील च्या साखर उद्योगाची ही विशेषता आहे की, अगदी सहजपणे साखरेपासून इथेनॉल उत्पादन करु शकतो. आपल्यालाही ब्राझील सारखे मॉडेल अंगिकारले पाहिजे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.