नवी दिल्ली : क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिल रेटिंग्स (Crisil Ratings) ने बाजारामधील उतार-चढावादरम्यान एकीकृत साखर कारखान्यांना स्थिर व्यवस्थापन लाभाच्या अपेक्षेसह भारतीय साखर कारखान्यांविषयी एक आशाजनक दृष्टिकोन असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे. आपल्या अहवालात क्रिसिल रेटिंग्सने म्हटले आहे की, देशांतर्गत साखरेच्या किमतींमधील वाढ आणि इथेनॉलची वाढती विक्री यापासून कारखान्यांना फायदा होईल. देशांतर्गत साखरेच्या चढ्या किमती आणि इथेनॉल विक्रीतील वाढ झाल्याने आर्थिक वर्ष २०२४ च्या दरम्यान उसाच्या उत्पादन खर्चातील वाढ आणि निर्यातीतील तूट यांची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे.
या अहवालानुसार, यावर्षी मार्च आणि जून यादरम्यान देशांतर्गत साखरच्या किमतींमध्ये जवळपास ५ टक्के वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या ३२ रुपये प्रती किलो या स्थिर किमतीवरून त्या ३४ रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. किमतीमधील वाढीमुळे ३० सप्टेंबर रोजी समाप्त होणाऱ्या चालू हंगामात एकूण साखर उत्पादनात ७ टक्क्यांच्या घसरणीचे अनुमान आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्रात अवकाळी पावसाचा प्रतिकूल परिणामांचा हा प्रभाव असेल.
कमी काळासाठी साखरेच्या किमती सध्याच्या स्तरावर राहतील. २०२३-२४ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी अधिकाधिक ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्याने शुद्ध साखर उत्पादनात किरकोळ वाढीची अपेक्षा आहे, असे अहवालात म्हटले आहे.
क्रिसिल रेटिंग्सच्या संचालक पुनम उपाध्याय म्हणाल्या, की, इथेनॉलचे सातत्याने वाढते प्रमाण, सरकारच्या धोरणांमुळे चांगली रिकव्हरी, उसाच्या वाढत्या दराचा प्रभाव कमी करतील. उपाध्याय यांनी अलिकडील देशांतर्गत साखर पुरवठ्यातील सुधारणांचा उल्लेख केला. त्यामुळे कमी निर्यातीनंतरही गेल्या आर्थिक वर्षातील ११ टक्केच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकीकृत साखर कारखाने कामकाजाचा लाभ ११-१२ टक्क्यांवर टिकवून ठेवू शकतात.
आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने अलिकडेच उसाची एफआरपी वाढवून ३१५ रुपये प्रती क्विंटल केली आहे. उसाच्या किमतीमधील बदलांच्या आधारावर हा दर समायोजित करण्याच्या प्रक्रियेसह इथेनॉलच्या दरात किरकोळ वाढ दिसू शकेल.