बर्लिन : चीनी मंडी
भारताने साखर निर्यातीसाठी दिलेल्या अनुदानाला ऑस्ट्रेलिया पाठोपाठ युरोपमधूनही विरोध होण्याची चिन्हे आहेत. निर्यात अनुदानामुळे जागतिक बाजारात साखरेचे भाव आणखी घसरतील. त्यामुळे युरोपियन युनियन आणि जर्मनीतील साखर उद्योग संघटना डब्ल्यूव्हीझेड याला विरोध करतील, असे बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतात गेल्या बुधवारी साखरेचा अतिरिक्त साठा निकाली काढण्यासाठी साडे पाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले. भारताने ५० लाठ टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी साखर उत्पादकांना प्रोत्साहन दिले जात आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ ब्राझीलच्या सरकारनेही हा विषय गंभीर असल्याचे म्हटले आहे.
जर्मनीतील साखर उद्योग संघटना डब्ल्यूव्हीझेड यांनी म्हटले आहे की, भारतात साखर उत्पादन आणि निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे जागतिक बाजारात साखरेची पुन्हा घसरण झाल्याचे डब्ल्यूव्हीझेडचे मत आहे. गुरुवारी जागतिक बाजारात साखरेचा दर दहा वर्षांतील निचांकी पातळीवर होता. भारताच्या निर्यातीमुळे जागतिक बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा होईल आणि किमती आणखी घसरतील, असे डब्ल्यूव्हीझेडचे अध्यक्ष हान्स-जॉर्ज गेभार्ड यांनी म्हटले आहे. त्यावर युरोपियन युनियनने योग्य कारवाई हाती घ्यावी, असे आवाहनही गेभार्ड यांनी केले आहे.