नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनद्वारे (ISMA) जारी रिपोर्टनुसार, जून २०२२ च्या उपग्रहाकडून प्राप्त छायाचित्रानुसार, देशात २०२२-२३ या हंगामात उसाचे एकूण क्षेत्र ५८.२८ लाख हेक्टर असेल असा अंदाज आहे. यापूर्वीच्या २०२१-२२ या हंगामात ऊस क्षेत्र ५५.८३ लाख हेक्टरपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहे. लागवड क्षेत्रातील वाढ आणि उसाचे उत्पादनातील अपेक्षित वृद्धीबाबत २२ जुलै २०२२ रोजी ISMA च्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी देशभरातील साखर उत्पादक राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत ऊस क्षेत्राची छायाचित्रे, अपेक्षित उत्पादन, साखर उतारा, गेल्या आणि चालू वर्षातील पावसाचा परिणाम, धरणांतील पाणीसाठा आणि इतर संबंधीत गोष्टींच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानुसार २०२२-२३ या हंगामात सुरुवातीच्या टप्प्यासाठी अनुमान जारी करण्यात आले आहे.
हे अनुमान बी हेवी मोलॅसीस आणि उसाचा रस, सिरपला इथेनॉल उत्पादनासाठी बदलण्याच्या कारणामुळे साखरेच्या कमतरतेबाबत विचार केल्याशिवाय काढण्यात आले आहे. इथेनॉलकडे डायव्हर्शन करण्याआधी साखरेचे निव्वळ उत्पादन ३९९.९७ लाख टन होईल असे अनुमान आहे. तर २०२१-२२ मध्ये साखरेचे अनुमानीत उत्पादन ३९४ लाख टन उत्पादन होते. तर चालू वर्षे इथेनॉल उत्पादनाकडे साखरेचे डायव्हर्शन अधिक होईल, अशी शक्यता आहे.
चालू हंगामात १० जुलै २०२२ पर्यंत इथेनॉलचे एकूण करार ४४४.४२ कोटी लिटर होते. यामध्ये ३६२.१६ कोटी लिटर उत्पादन साखर उद्योगापासून आहे. या ३६२.१६ कोटी लिटरमध्ये ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीस (BHM)पासून निर्मिती केलेले इथेनॉल ३४९.४९ कोटी लिटर (उसाच्या रसापासून ७९.३३ कोटी लिटर आणि BHM पासून २७०.१६ कोटी लिटर असेल. यातून साधारणतः ३४ लाख टन साखरेचे डायव्हर्शन केले जाते.
उसाचा रस, सिरप आणि बी हेवी मोलॅसीस यांचे महत्त्वपूर्ण प्रमाण पुन्हा एकदा इथेनॉल उत्पादनात बदल करण्यात आले आहे. पुढील हंगामात साखरेचे प्रमाण देखील बदलेल. उच्च इथेनॉल उत्पादन क्षमता आणि पुढील वर्षी सतत अतिरिक्त ऊस असल्याने मोठ्या प्रमाणात उसाचा रस/सिरप आणि बी-हेवी मोलॅसेस इथेनॉलमध्ये रूपांतरित केले जातील.
पुढील वर्षी २०२२-२३ मध्ये इथेनॉल मिश्रण १२ टक्के होण्याची अपेक्षा आहे. एकूण साधारणतः ५४५ कोटी लिटर इथेनॉलची गरज या उद्दिष्टपूर्तीसाठी असेल. आणि त्याची पूर्तता केली जाईल. त्यानुसार असे अनुमान आहे की, ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीसला इथेनॉलमध्ये बदलल्यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादनात ४५ लाख टनाची कमतरता भासेल. तर या वर्षी ३४ लाख टनाचा वापर करण्यात आला आहे. ऊसाचा रस आणि बी हेवी मोलॅसीसला इथेनॉलमध्ये बदलल्याने ४५ लाख टनाची कमतरता भासल्यानंतर ISMA च्या अनुमानानुसार, २०२२-२३ मध्ये ३५५ लाख टन साखर उत्पादन असेल. तर खप सुमारे २७५ लाख टन असेल. तर जवळपास ८० लाख टन साखर निर्यात करण्याची गरज भासेल. उर्वरित कालावधीतील सामान्य पाऊस आणि इतर पूरक परिस्थिती गृहीत धरून वरील अंदाज बांधण्यात आले आहेत.