Indian Oil आणि LanzaJet भारताची पहिला पहली हरित विमान ईंधन फर्म स्थापन करणार

नवी दिल्ली : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) टिकाऊ विमान ईंधना (SAF) च्या उत्पादनासाठी अमेरिकास्थित स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी LanzaJet Inc आणि देशांतर्गत एअरलाइन्ससोबत एक संयुक्त उद्योग (JV) स्थापन करण्याची योजना तयार करीत आहे. या प्रस्तावित उद्योगाच्या माध्यमातून ३,००० कोटी रुपये खर्चून हरियाणामध्ये IOCL च्या पानीपत रिफायनरीत अल्कोहोल टू जेट या तंत्रासोबत एसएएफ तयार करण्यासाठी एक प्लांट स्थापन केला जाईल. प्रस्तावित प्लांटमध्ये मक्क्यावर आधारित सेल्यूलोसिक अथवा साखरेवर आधारित इथेनॉलला एफएएफमध्ये रुपांतरीत केले जाईल. आणि यामधून वार्षिक ८५,००० टन इंधनाचे उत्पादन करण्याची प्राथमिक क्षमता असेल. SAF पारंपरिक जेट ईंधनाच्या समान गुणधर्म असणारे जैविक इंधन आहे. मात्र, यापासून कार्बन उत्सर्जन कमी होते.

नवी कंपनीने तयार केलेल्या पद्धतीप्रमाणे, IOCL चा ५० टक्के हिस्सा असेल तर LanzaJet Inc ची भागीदारी २५ टक्क्यांची राहील. याशिवाय उर्वरीत २५ टक्के हिस्सा एअरलाइन्स कंपन्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामध्ये अनेक एअरलाइन्स कंपन्यांसाठी दोन ते पाच टक्के हिस्सेदारी सादर केली जाऊ शकते. याशिवाय, इंधन विक्री निश्चित करण्यासाठी एअरलाइन्सशी करार केला जात आहे. इंधन वितरण कंपन्यांसोबत (ओएमसी) सरकारी अधिकाऱ्यांकडून अलिकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीनंतर काही प्रमुख एअरलाइन्स प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्राथमिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या विमानसेवेची निवड केली आहे. आणि अशाच पद्धतीने याला प्रोत्साहन देत एअरलाईन्स, विमानतळ आणि ग्राउंड हँडलर्सचा यामध्ये समावेश करण्यात येत आहे. यासोबतच नीती आयोगाने एसएएफवर पाच टक्के जीएसटीचा प्रस्ताव दिला आहे. सरकार एसएएफ संचलित उड्डाणांसाठी प्रवासी शुल्क आणि वापरकर्त्यांचे विकास शुल्क (विमानतळाद्वारे शुल्क) अशामध्ये सवलत (शुल्क माफी) देवू शकते, अशी सूचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here