भारतीय आता फ्रान्समध्ये करू शकणार UPI पेमेंट, सरकारची डील यशस्वी

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांदरम्यान भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयबाबत एक डील झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला फ्रान्समध्येही याचा वापर करता येणार आहे.

आजतकमधील वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारतीयांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय पर्यटक आयफेल टॉवरमध्येही युपीआय पेमेंट करण्यास सक्षम होतील. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. फ्रान्समध्ये युपीआयमध्ये बिले देण्याबाबत सहमती झाली आहे. त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल. भारतीय येथे यूपीआयद्वारे रुपयात पेमेंट करू शकतील. भारताच्या या सामंजस्य कराराने एक नवी बाजारपेठ खुली होईल.

पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधताना त्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारत गतीने विकसित होत आहे. त्यामध्ये गुंतवणुकीच्या असंख्य संधी आहेत. रेटिंग एजन्सीसुद्धा भारताला चमचमता तारा असल्याचे सांगत आहेत. भारत आणि फ्रान्स दीर्घ काळापासून पुरातत्वीक मिशनवर काम करीत आहेत. त्याचा विस्तार चंदिगढपासून लडाखपर्यंत आहेत. याशिवाय डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर दोन्ही देशातील संबंध मजबूत करेल असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here