एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत भारताच्या कोळसा उत्पादनात 16.39% वाढ होऊन ते 607.97 मेट्रिक टन इतके वाढले. आर्थिक वर्ष 21- 22 च्या याच कालावधीत हे उत्पादन 522.34 मेट्रिक टन होते. कोल इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 22- 23 मध्ये, डिसेंबर 2022 महिन्यापर्यंत 479.05 मेट्रिक टन कोळसा उत्पादन नोंदवले, आर्थिक वर्ष 21- 22 च्या याच कालावधीमध्ये 413.63 मेट्रिक टन कोळसा उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेने यंदा 15.82% ची वाढ दर्शवण्यात आली.
कोळसा मंत्रालयाने बंदिस्त कोळसा खाणींच्या खाण क्षमतेचा अधिकाधिक वापर करून अतिरिक्त कोळसा बाजारात कसा येईल, याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे एप्रिल-डिसेंबर 22 या कालावधीत बंदिस्त कोळसा खाणी आणि इतर कंपन्यांच्या कोळशाच्या उत्पादनात 31.38% वाढ होऊन उत्पादनात 81.70 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 21- 22 च्या संबंधित कालावधीत कोळशाचे 62.19 मेट्रिक टन उत्पादन झाले होते. बंदिस्त खाणींच्या भाडेपट्टेधारकांनी वापरासंदर्भात प्रकल्पांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर एकूण अतिरिक्त उत्पादनाच्या 50% पर्यंत कोळसा/लिग्नाइट विकण्याची परवानगी देण्यासाठी मंत्रालयाने एमएमडीआर (सुधारणा) कायदा, 2021 अंतर्गत खनिज सवलत (सुधारणा) नियम, 1960 मध्ये देखील सुधारणा केली आहे.
जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पीएम गति शक्ती अंतर्गत सर्व प्रमुख खाणींसाठी रेल्वे संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मंत्रालय पावले उचलत आहे. परिणामी, एप्रिल-डिसेंबर 22 -23 या कालावधीत एकूण 637.51 मेट्रिक टन कोळसा संबंधित ठिकाणी पाठवण्यात आला आहे,आर्थिक वर्ष 21- 22 च्या याच कालावधीतील 594.22 मेट्रिक टनच्या तुलनेत यात 7.28% ची वाढ झाली आहे, ही वाढ देशभरातील विविध क्षेत्रांसाठी स्थिर आणि कार्यक्षम प्रमाणात कोळसा पाठवल्याचे दर्शवते.
कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, कोळसा मंत्रालयाने 141 नवीन कोळसा खाणी व्यावसायिक लिलावासाठी ठेवल्या आहेत आणि देशातील विविध कोळसा कंपन्यांशी नियमितपणे संपर्क साधून त्यांच्या उत्पादनावर लक्ष ठेवत आहे. देशांतर्गत उत्पादन आणि वितरण वाढवण्यासाठी केलेल्या सर्वांगीण प्रयत्नांचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.
(Source: PIB)