इथेनॉलचे मिश्रण ही ट्रिलियन डॉलर गुंतवणुकीची संधी : मंत्री हरदीप पुरी

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘ईटी एनर्जीवर्ल्ड’शी केलेल्या विशेष संभाषणात भारताचे जैवइंधन क्षेत्रातील यश आणि ऊर्जा क्षेत्रातील विकास योजनांवर प्रकाशझोत टाकला. त्यांनी अन्न सुरक्षेविषयीच्या चिंताही दूर केल्या. जागतिक आव्हानांदरम्यान, भारत इंधन पुरवठा स्त्रोतांमध्ये विविधता कशी आणत आहे याबाबत त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले की, G२० चे अध्यक्षपद हे एक जबरदस्त यश होते. विभाजित जगाला भारताने एकत्र आणण्याचे काम केले. याव्यतिरिक्त, भारताच्या G२० अध्यक्षपदाच्या काळातआम्ही ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स लाँच केले, यामध्ये १९ देशांचा समावेश आहे. आम्ही कनेक्टिव्हिटी, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर चर्चादेखील सुरू केली.

मंत्री पुरी म्हणाले, ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. भारताने २०२५ पर्यंत जैवइंधन मिश्रणात २० टक्क्यापर्यंत पोहोचण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार आम्ही वेगाने पुढे जात आहोत. यातून ट्रिलियन-डॉलरच्या संधीचे प्रतिनिधित्व दिसते.

पुढील १५ वर्षांसाठी भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची योजना करण्यात आली आहे, यातून कनेक्टिव्हिटी, शिपिंग लाईन्स, बंदरे, रेल्वे लिंक्स आणि वस्तू आणि लोकांची अखंडित ये-जा सुरू राहावी यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. हा कॉरिडॉर ऐतिहासिक व्यापारी मार्गांना पुनरुज्जीवित करू शकतो.

आम्ही इथेनॉल मिश्रणाचे १० टक्के उद्दिष्ट आधीच गाठले आहे आणि २० टक्क्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी आधीच पुरेशी कामगिरी केली आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गावर आहोत. भारताचा जैवइंधन कार्यक्रम अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण आहे. जैवइंधनविरुद्ध अन्न सुरक्षा हा वाद भ्रामक आहे, असा दावा त्यांनी केला.

जैवइंधनाच्या मिश्रणामुळे भारताने गेल्या नऊ वर्षांत सुमारे ७३,००० कोटी रुपयांच्या आयात बिलात बचत केली. शेतकऱ्यांना ७६,००० कोटी रुपये दिले आहेत. जैवइंधनाचे मिश्रण वाढवून, लाखो शेतकर्‍यांना फायदा करून देत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here