भारताचा परकीय चलनसाठा ५.८७ अब्ज डॉलरने घटला, जाणून घ्या किती आहे चलनसाठा

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार १७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलनसाठा ५.८७ अब्ज डॉलरने घटून ५९०.५८८ अब्ज डॉलर राहीला आहे. १० जून रोजी संपलेल्या आधीच्या आठवड्यात हा साठा ४.५९९ बिलियन अमेरिकन डॉलर घटून ५९६.४५८ बिलियन डॉलर झाला होता. १३ मे रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.६७६ बिलियन डॉलरची घट नोंदविण्यात आली होती. ३ सप्टेंबर २०२१ मध्ये भारताकडील चलनसाठा सर्वकालीक उच्चांकी स्तरावर, ६४२.४५३ बिलियन डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर यातमध्ये वेगाने घसरण झाली आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, या सप्ताहात परकीय चलन साठ्यात घसरण झाली आहे. फॉरेन करन्सी अॅसेटचा घटक असलेल्या सोन्याच्या साठ्यातही घसरण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या शुक्रवारी जारी केलेल्या सांख्यिकीय अनुपूरक आकडेवारीनुसार FCA ५.३६२ बिलियन अमेरिकन डॉलरवरून घटून ५२६.८८२ बिलियन अमेरिकन डॉलर झाला आहे. फॉरेक्स अॅसेटमधील युरो, पाऊंड, येन सारख्या गैर अमेरिकन युनिट्सच्या डिप्रिसिएशनचा समावेश आहे. सोन्याचा साठा २५८ मिलियन अमेरिकन डॉलरन घसरून ४०.५८४ अमेरिकन डॉलर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here