भारताच्या परकीय चलन साठ्यात ४.५ अब्ज डॉलरची वाढ

नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनसाठ्यात २८ एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात ४.५३२ अब्ज डॉलरची वाढ होवून हा साठा आता ५८८.७८ अब्ज डॉलर झाला आहे. गेल्या आठवड्यात या चलनसाठ्यात २.१६४ अब्ज डॉलरची घट होवून तो ५८४.२४८ अब्ज डॉलरवर आला होता. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाकडील परकीय चलन ६४५ अब्ज डॉलरच्या उच्चांकावर पोहोचले होते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये असे दिसून येते की, आरबीआयने रुपया टिकवण्यासाठी आपल्याकडील परकीय चलन साठ्याचा वापर केला होता. त्यामुळे मध्यंतरी या साठ्यात घसरण झाली होती. आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकी आकडेवारीनुसार, २८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन संपत्ती जवळपास पाच अब्ज डॉलरने वाढून ५१९.४८५ अब्ज डॉलरवर पोहोचली.
दरम्यान, देशाकडील सुवर्ण साठ्यात ४९.४ कोटी डॉलरच्या घसरण दिसून आली आहे. हा साठा आता ४५.६५७ अब्ज डॉलरवर आला आहे. यापूर्वी २१ एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात चलन साठ्यात घसरण दिसून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here