मुंबई: या आठवड्यात भारतामध्ये सरासरीपेक्षा 35 टक्के पाउस कमी झाला तसेच मध्य, पश्चिम आणि उत्तर भागात कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितलेे आहे. उन्हाळ्यात पेरणी केलेल्या पिकांच्या उत्पादानाची शेतकर्याची चिंता वाढत आहे.
भारताची अर्थव्यवस्था आशियातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून 2.5 अब्ज डॉलर्स पैकी 15 टक्के केवळ कृषी क्षेत्र भारतात आहे. म्हणूनच शेतीच्या उत्पादनासाठी मान्सून पाऊस महत्त्वपूर्ण आहे. कारण भारतातील सुमारे 55% जिराईत जमीन पावसावर अवलंबून आहे.
हवामानात खात्याच्या आकडेवारीनुसार, यंदा पाऊस सोयाबीन पिकवणार्या मध्य प्रदेशात, सरासरीपेक्षा 67% पाऊस कमी झाला, तर कापूस उत्पादक गुजरातमध्ये 47% कमी झाला आहे. एकूणच भारतात मान्सून सुरू झाल्यापासून पाऊस सरासरीपेक्षा 19% कमी पडला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.