भारतातील तांदूळ उत्पादन पिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे 2 दशलक्ष टनांनी कमी होऊन 132 दशलक्ष टन होईल, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) आपल्या नवीन पीक अंदाजात म्हटले आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाने खरीप पिकांवर परिणाम झाल्याने भात (तांदूळ) उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी महिन्यांत घेतलेल्या भाताचा समावेश आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अन्नधान्य उत्पादनाबाबत सरकारच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, २०२२-२३ या हंगामात तांदळाचे एकूण उत्पादन १३५.५ दशलक्ष टन अपेक्षित आहे. तथापि, यूएसडीएने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे २०२३-२४ मध्ये भारतातील तांदूळ उत्पादन २० लाख टनांनी कमी होऊन १३२ दशलक्ष टन होऊ शकते.’
मात्र, हा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीशी जुळेल की नाही हे अद्याप निश्चित नाही. सरकारने अद्याप २०२३-२४ साठी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केलेला नाहीत. यूएसडीएने आपल्या अहवालात म्हटले आहे की यंदा जगभरात तांदळाचा वापर २ लाख टनांनी कमी होऊन ५२२.७ दशलक्ष टन होईल. अहवालात असेही म्हटले आहे की तांदळाचा जागतिक व्यापार ८ लाख टनांनी घसरून ५२.२ दशलक्ष टनांवर येईल.
थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिकेतील उच्च निर्यातीद्वारे भारतातून तांदूळ निर्यातीतील घट अंशतः भरून काढली जाऊ शकते. भारत सरकारने तांदूळ निर्यातीवर आधीच निर्बंध लादले आहेत, याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.