भारत सरकारने नुकतेच साखर निर्यातीवर अनुदान जाहीर केले. पण हे अनुदान टिकाव धरणारे नाही, तसेच जागतिक बाजारपेठेचा विचार करता या अनुदानामुळे साखरेच्या किंमतीत मोठया प्रमाणात घट होईल, असा दावा ब्राझिलियन साखर उद्योग समूह युनिका यांनी केला.
युनिकाचे प्रमुख इव्हॅन्ड्रो गुसी म्हणाले की, भारत सरकारच्या या निर्णयामुळे जागतिक साखर बाजारपेठेतील मुक्त स्पर्धा संपुष्टात येण्याचे चित्र दिसत आहे. शिवाय, अनुदानाचा निर्णय देखील जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांनुसार घेतलेला नाही.
ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या चौकटीत येेणाऱ्या अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.