जागतिक दरवाढ, कमजोर रुपयामुळे भारताच्या साखर निर्यातीला गती

नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी अलिकडेच ५,५०,००० टन साखर निर्यात करण्यासाठीच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. जागतिक स्तरावर किमतीत वाढ, कमकुवत रुपयामुळे परदेशी विक्रीवर भर दिला जात आहे. साखर निर्यात वाढविल्याने भारताला आपला अतिरिक्त साठा कमी करण्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यास मदत होईल. या आठवड्यात रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे विदेशी विक्रीतून व्यापाऱ्यांचे मार्जिन वाढले आहे. भारतात २०२१-२२ या हंगामात ३३.३ मिलियन न साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे ७ टक्क्यांनी अधिक आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कारखाने बाजारात सक्रिय होते. त्यांनी स्थानिक विक्रीच्या तुलनेत चांगलीनिर्यात संधी साधली आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, भारतीय कारखान्यांनी आतापर्यंत २०२१-२२ मध्ये ६.४ मिलियन टन साखर निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यापैकी जवळपास ५ मिलियन टन साखर आधीच पाठविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय व्यापाऱ्यांनी मुख्यत्वे इंडोनेशिया आणि बांगलादेश यांसारख्या आशियाई खरेदीदारांना साखर विक्री केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here