हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
अमेरिकेने निर्बंध लादलेल्या इराणसाठी भारताची साखर आता गोड ठरणार आहे. कारण, अमेरिकी डॉलरमध्ये व्यवहार करण्यास बंदी असल्याने इराण आता त्यांच्या तेलाची विक्री भारताला करून, भारताकडून साखर खरेदी करणार आहे.
भारताला तेल विक्री करून मिळालेला भारतीय रुपया कोठे खर्च करायचा असा प्रश्न इराणपुढे आहे. साऊथ एशियन नेशन्स बँकेमध्ये हा इराणचा भारतीय रुपया पडून आहे. त्याचेवळी भारतात साखरेचा साठा मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. या परिस्थिती दोन्ही देशांचा प्रश्न तात्कालिक स्वरूपात सुटू शकतो.
इराणच्या गव्हर्नमेंट ट्रेडिंग कार्पोरेशनने आता दीड लाख टन साखर भारतातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याची डिलिव्हरी देण्यात येणार असून, त्याचे पैसे भारतीय रुपयातच देण्यात येणार आहेत.
यापूर्वी इराण ब्राझीलकडून साखर आयात करत होता. पण, आता भारतीय साखर उद्योगाला ब्राझीलची ही बाजारपेठे हिसकावून घेतल्याचे समाधान आहे. भारतीय रुपयात होणाऱ्या या व्यवहारामुळे भारतालाही दिलासा मिळणार आहे. कारण, इराणवर अमेरिकेचे निर्बंध असल्यामुळे भारताला अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयातच व्यवहार करता येणार आहे. या व्यवहारामुळे सलग दुसऱ्या वर्षी अतिरिक्त साखर उत्पादन झालेल्या भारतापुढे जादा पुरवठ्याचा असलेला प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत असलेला भारत आता निर्यातीलाही चालना देणार आहे.
इराण सारख्या देशाला आणखी खाद्य पदार्थ निर्यात करण्याची भारतामध्ये क्षमता आहे. भारतानेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी इराणकडून १२६ कोटी डॉलरचे कच्चे तेल खरेदी केले होते. तर, इराणला बासमती तांदूळ, तेलबिया, मांस, चहा असा २९ कोटी डॉलरचा माल विकला होता.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp