भारताचे २०२४-२५ हंगामामध्ये एकूण ३४.५ दशलक्ष टन साखर उत्पादन अपेक्षित : राहिल शेख

मुंबई : भारताचे २०२४-२५ हंगामामध्ये एकूण ३४.५ दशलक्ष मेट्रिक टन (MMT) साखर उत्पादन असेल आणि ४ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन इथेनॉल उत्पादनासाठी जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. उत्पादनाच्या पूर्वानुमानावर बोलताना, मीर कमोडिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि साखर उद्योग तज्ज्ञ राहिल शेख म्हणाले की, २०२४-२५ या हंगामासाठी भारताचे एकूण साखर उत्पादन ३४.५ एमएमटी आणि ४ एमएमटी साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविली जाण्याची शक्यता आहे.

शेख यांनी शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर ऊस बिले मिळाल्याच्या बाजूवर भर दिला. शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र वाढविण्याचा विचार करावा आणि आपल्या पिकांची चांगली काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचविले. भारतातील ऊस पिकाच्या यंदा, २०२५ मधील आणि त्यापुढील दृष्टिकोनावर बोलताना ते म्हणाले, चांगला पाऊस आणि खूप जास्त एफआरपीमुळे उसाचे क्षेत्र ६.० दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढताना दिसत आहे. २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खूप चांगले पीक असेल. कदाचित ते विक्रमी पिक ठरेल. भारताने आपले २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठताना आणखी काही निर्यातीच्या संधी पाहिल्या पाहिजेत असे ते म्हणाले.

दरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने अलीकडेच, ८ जुलैपर्यंतच्य खरीप पिकांच्या क्षेत्र व्याप्तीची माहिती प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, यावर्षी उसाचा पेरा ५६.८८ लाख हेक्टरवर पोहोचला आहे तर २०२३ मध्ये उसाचा पेरा ५५.४५ लाख हेक्टर होता. सरकारला देशात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचा विश्वास आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल (पीपीएसी) च्या मासिक रेडी रेकनर अहवालानुसार, मे २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण १५.४ टक्के होते. हे एकत्रित इथेनॉल मिश्रण नोव्हेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत १२.६ टक्के इतके होते.

या लेखात सादर केलेली मते आणि तपशील पूर्णपणे तज्ज्ञांचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here