भारताने चालू हंगामात साखर निर्यातीचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आणि अनेक देशांमध्ये आपल्या साखरेची गोडी वाढवली आहे. इंडोनेशिया आणि बांगलादेश हे दोन देश सद्यस्थितीत भारतीय साखर निर्यातीत अव्वल क्रमांकावर आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनद्वारे (ISMA) जारी करण्यात आलेल्या अपडेट अहवालानुसार, चालू वर्षात इंडोनेशिया आणि बांगलादेशला सर्वाधिक निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीच्या हे प्रमाण ४४ टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत अंडोनेशिया आणि अफगाणीस्तानला ४८ टक्के साखर निर्यात झाली होती.
बाजारातील रिपोर्ट आणि बंदरातील स्थितीनुसार, आतापर्यंत ८० लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. आतापर्यंत ५७.१७ लाख टन साखर ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत निर्यात करण्यात आली आहे. गेल्या हंगामात या कालावधीत ३१.८५ लाख टनाची निर्यात झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये साधारणतः ७-८ लाख टन साखर निर्यातीच्या प्रक्रियेत आहे.
अलिकडेच केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग, ग्राहक व्यवहार, खाद्य सथा सार्वजनिक वितरण, कापड उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील प्रवेशातून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत मिळत असल्याचे सांगितले होते. जागतिक स्तरावर भारतीय साखरेची गोडी वाढली आहे.