जकार्ता : कोरोना च्या प्रकोपामुळे साखर आयातीमध्ये झालेला उशिर आणि कमी पुरवठ्या मुळे इंडोनेशिया मध्ये साखरेच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक नाराज आहेत. साखरेच्या किमतींचा मुद्दा मार्गस्थ करण्यासाठी इंडोनेशिया सरकारने नियमावली सक्तीची केली आहे. बुधवारी जकार्तामध्ये आर्थिक मुद्यांबाबतचे समन्वयक मंत्री एयरलांगा हार्टर्टो यांनी सांगितले की, सरकार घरगुती बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योगांना देण्यात आलेला साखर कोटा रिटेल मार्केटमध्ये डायव्हर्ट करत आहे. काही पुरवठादार देशांमध्ये लॉकडाउन मुळे साखरेच्या शिपमेंटमध्ये विलंब झाला आहे.
आत्यधिक साखर किंमतींमुळे चिंतेत असणारे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी बुधवारी मंत्रीमंडळाला पावले उचलण्यास सांगितले आहे. विडोडो यांनी सांगितले की, किमती वाढल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. इंडोनेशियामध्ये साखरेच्या रिटेल किमती जवळपास चार वर्षांच्या उच्च स्तरावर पोचल्या आहेत. थायलंड मध्ये कमी पीक आणि भारतात राष्ट्रव्यापी लॉकडाउनमुळे इंडोनेशिया ला साखर आयातीमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकी कृषी विभागानुसार, इंडोनशियाची साखर आयात 4.65 मिलियन टन होवू शकते, जी एक वर्षापूर्वी 4.03 मिलियन टन होती.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.