इंडोनेशिया २०२५ पर्यंत साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवेल. राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या दीर्घकालिन प्लॅनिंगचा हा एक भाग आहे असे, राज्याच्या मालकीची कंपनी पीटी पेर्केबुनन नुसंतारा (PTPN) III ने सांगितले.
PTPN IIIचे अध्यक्ष अब्दुल गनी यांनी गुरुवारी मध्य जावातील बटांग येथे सांगितले की, साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी PTPN III राष्ट्रीय साखर कारखान्यांना सर्वोत्तम बनविणे, ऊस शेतीचा विस्तार आणि विभागीय सरकारे, जनतेच्या सहकार्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल.
त्यांनी सांगितले की, इंडोनेशिया १९३० मध्ये २ मिलियन टन साखर निर्यात करत होता. तेव्हा त्यांचे साखर उत्पादन ३ मिलियन टन होते. त्यांनी सांगितले की वृक्षारोपणा अंतर्गत आधीच्या तुलनेत क्षेत्र दुप्पट झाले आहे. सध्या साखर उत्पादन ३ मिलियन टनापर्यंत पोहोचू शकत नाही. इंडोनेशिया जे२ मिलियन टन साखर निर्यात करत होतो, आता २ मिलियन टन साखर आयात केली जाते.
त्यांनी सांगितले की, PTPN IIIने २०२५ पर्यंत साखर उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करण्यासाठी राज्याच्या मालकीच्या उद्योगांच्या मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. उद्योग मंत्र्यांच्या निर्देशानुसार आम्ही साखर उद्योगाच्या परिवर्तनाचा कार्यक्रम तयार करीत आहोत.