जकार्ता : इंडोनेशियाच्या ऊर्जा मंत्रालयाने पुढील तीन वर्षात ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशातील बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबत नवा रोडमॅप विकसित करण्यात आला आहे. बायोइथेनॉल इंधनाची सुरुवात ५ टक्के साखरेवर आधारित इथेनॉलला पर्टेमिनाच्या ९०-ऑक्टेन अथवा उच्च ऑक्टेन पेट्रोलसोबत मिसळून केली जावू शकते. याचा प्रारंभ राजधानी जकार्ता आणि पूर्व जावामध्ये केला जात आहे. मध्यम कालावधीमध्ये या मिश्रणाला १० टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि जावातील मोठ्या लोकसंख्येच्या द्विपकल्पासह इतर ठिकाणी लागू केले जाण्याची अपेक्षा आहे. इंडोनेशियाच्या सरकारने २०३१ पर्यंत १५ टक्के बायोइथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. उच्च इंधनाच्या किमतींमुळे हवालदिल झालेल्या इंडोनेशियाने आता इंधनाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.
ऊर्जा मंत्रालयाचे बायोएनर्जी संचालक ए. डी. विबोवो यांनी सांगितले की, इंडोनेशियाला आता उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल उत्पादनाची आपली क्षमता वाढविण्याची गरज आहे. ते म्हणाले की, देशात इंधन ग्रेड बायो इथेनॉलचे वार्षिक उत्पादन सध्या ४०,००० किलो लिटर आहे. ईंधन-ग्रेड बायोइथेनॉल उत्पादकांकडून उपलब्ध पुरवठा पूर्व जावा आणि जकार्तामध्ये केवळ ५.७ टक्के मागणी पूर्ण करू शकतो. त्यामुळे पुरवठ्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे दिसून येते. राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, इंडोनेशियाला आपल्या साखर बागायतीच्या क्षेत्राचा विस्तार करायचा आहे. तरच आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. आणि साखरेवर आधारित इथेनॉल विकसित करण्याकडे लक्ष दिले जावू शकेल. इंडोनेशियामध्ये सद्यस्थितीत डिझेल इंधनामध्ये ताडाच्या तेलावर आधारित इंधन ३० टक्के अनिवार्य आहे. याला B३० च्या रुपात ओळखले जाते. यातून देशाला इंधन आयात बिल कमी करण्यास मदत मिळाली आहे.