जकार्ता (इंडोनेशिया) : चीनी मंडी
इंडोनेशियामध्ये २०१९मध्ये २४ लाख ५० हजार टन साखर उत्पादनाचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे. देशातील तीन साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादन सुरू करण्यात आले असून, प्रक्रिया युक्त शुद्ध पांढरी साखर तयार करण्यात येत आहे. इंडोनेशियाच्या कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
इंडोनेशियात २०१८मध्ये २१ लाख ७० हजार टन साखर उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदाचे लक्ष्य १३ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील साखरेचे उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेसाठी पुरेसे आहे. त्यामुळे साखर आयात करण्याची आवश्यकता भासणार नाही.
देशातील औद्योगिक बाजारपेठेसाठी मात्र २८ लाख ३० हजार टन साखरेचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp