जकार्ता : इंडोनेशिया सरकारने रमजान आणि ईद उल फित्रच्या महिन्यात देशांतर्गत पुरवठा टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी २,१५,००० टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न एजन्सी (एनएफए) चे प्रमुख एरिफ प्रत्येसो यांनी म्हटले आहे की, ही साखर आयात देशाच्या स्वामित्वाखालील अन्न उद्योग आयटी फूड अँड प्लांटेशन होर्डिंग्ज कंपनी पीटीपीएनद्वारे केली जाणार आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत देशांतर्गत साखर उत्पादन २.६ मिलियन टनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत मागणी ३.४ मिलियन टनांपर्यंत जाईल असे अनुमान आहे.
सरकारने देशांतर्गत तुटवडा रोखण्यासाठी परदेशी बाजारपेठेतून साखर आयात करण्यासाठी गतीने पावले उचलली आहेत.देशाच्या स्वामित्वाखालील उद्योग मंत्रालयाने दोन कंपन्यांना टप्प्याटप्प्याने साखर आयात करण्याचे काम सोपवले आहे. आयाता केलेली साखर जकार्तामधील तंजुंग प्रोक, सुरबायामधील तंजुंग पेराक आणि बेलावन या तीन बंदरात पोहोचेल. आयातीच्या निर्णयाला जानेवारीतील मंत्रिस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत सहमती देण्यात आली होती. अन्न पुरवठा आणि किमती स्थिर ठेवणे हा यामागील उद्देश आहे आणि सरकार अन्न भांडारात (सीपीपी) सुधारणा करु इच्छित आहे.