हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
जकार्ता (इंडोनेशिया) : चीनी मंडी
ऑस्ट्रेलियासोबत इंडोनेशियाने केलेल्या व्यापार करारामुळे इंडोनेशियातील ऊस उत्पादन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या इंडोनेशिया-ऑस्ट्रेलिया कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपमुळे इंडोनेशियातील स्थानिक साखर बाजारावर परिणाम होईल, अशी भीती ऊस उत्पादकांना वाटू लागली आहे.
साखरेच्या आयात शुल्कात बदल केल्यास स्थानिक साखर उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे मत इंडोनेशियातील ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सौमित्रो समादिकोएन यांनी व्यक्त केले आहे. सध्या ऑस्ट्रेलियातून इंडोनेशियाला कच्ची साखर निर्यात केली जाते. या संदर्भात समादिकोएन म्हणाले, ‘इंडोनेशियातील साखर उत्पादन परवडणारे नाही. कारण, शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवून ठेवला आहे. त्यामुळे जर आयात साखरेवरील शुल्क कमी केले तर, देशातील साखरेशी असणारी स्पर्धात्मकताच नाहीशी होईल. याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. तर, दुसरीकडे या कराराचा फायदा आयातदारांना होईल.’ सरकार व्यापार करार करताना शेतकऱ्यांचा फारसा विचार करत नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, इंडोनेशियात पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. इंडोनेशियाला जनावरांची निर्यात करणारा ऑस्ट्रेलिया हा प्रमुख देश आहे, त्यामुळे त्याचा इंडोनेशियातील पशूपालनावर निश्चित परिणाम होईल, असे शेतकरी व्यक्त करत आहेत. मुळातच भारतातून जनावरांची आयात वाढल्यामुळे इंडोनेशियातील जनावरांचा उद्योग अडचणीत आला आहे. त्यात या करारामुळे अडचणींमध्ये भर पडणार आहे, असे मत जनावरांचे प्रजनन करणाऱ्यांच्या असोसिएशनचे अधिकारी टेगुह बोईदियान यांनी व्यक्त केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp