कानपुर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI), कानपुरने इंडोनेशियातील योग्याकार्टामध्ये असलेल्या पॉलिटेक्निक पोर्कबन LPP या संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा MoU एनएसआईचे संचालक प्राध्यापक नरेंद्र मोहन आणि इंडोनेशियाचे भारतातील राजदूत इना कृष्णमूर्ती यांदरम्यान विदेशी मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सामंजस्य करारावर १७ जून रोजी नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारानुसार एनएसआय साखर आणि इथेनॉल उत्पादन, वीज उत्पादन, पर्यावरण आणि गुणवत्ता नियंत्रण याच्याशी संबंधीत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी इंडोनेशियातील संस्थांना मदत करेल.
NSI च्यावतीने इन्स्टिट्यूट फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि अन्य अनुकल प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल. त्यातून इंडोनेशियातील संस्था साखर आणि संबंधीत उद्योगांना सक्षम बनविण्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करू शकतील. प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, आम्ही सुविधा आणि गरजांनुसार अशा कार्यक्रमांचे आयोजन भौतिक अथवा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आहोत. प्रा. मोहन म्हणाले की, इंडोनेशियातील विद्यार्थ्यांनाही नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यासाची संधी मिळेल. हा सामंजस्य करार दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल आणि मला असे वाटते की, इंडोनेशियातील साखर उद्योग आमच्या संस्थेच्या मदतीने उच्च स्तरावर पोहोचेल.