इंडस टॉवर्स आणि आयआयटी मद्रासने केले संशोधन आणि विकास लॅबचे लाँचिंग

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासच्या सहकार्याने इंडस टॉवर्सने (Indus Towers) आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये ग्रीन हायड्रोजन आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणालींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संशोधन आणि विकास (आरअँडडी) प्रयोगशाळा सुरू केली आहेत. सौरऊर्जेवर चालणारी हायड्रोजन उत्पादन प्रणाली तयार करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. आयआयटी मद्रासने सांगितले की, ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड मोनो क्रिस्टलाइन सौर पॅनेल, अल्कलाइन/पीईएम इलेक्ट्रोलायझर आणि पीईएम इंधन पेशींद्वारे १०० टक्के ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रदर्शित करते.

समांतर बॅटरी अभियांत्रिकी लॅबचा बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (BMS) विकसित केल्याने विविध ॲप्लिकेशन्समध्ये सुरक्षित आणि विश्वासार्ह बॅटरी कार्यप्रदर्शन सुनिश्चित होते. या प्रकल्पाचे उद्दिष्ट बॅटरी पॅक लाइफटाईम सुधारणे असा आहे. उद्योगांमध्ये रिचार्ज करण्यायोग्य ली-आयन बॅटरीच्या व्यापक वापराची पूर्तता करणे आणि प्रभावी थर्मल नियंत्रणासाठी अचूक स्थिती अंदाज दर्शविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याबाबत इंडस टॉवर्सचे मुख्य नियामक अधिकारी आणि सीएसआर मनोज कुमार सिंग म्हणाले की, इंडस टॉवर्सची कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी जीवाश्म इंधनापेक्षा अक्षय ऊर्जा मिश्रणाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्यावर केंद्रित आहे. आम्ही आमच्या प्रमुख सीएसआर कार्यक्रम – प्रगती अंतर्गत उर्जेच्या नवीन स्रोतांच्या शोधात वाटचाल करीत आहोत. आयआयटीएम सोबतच्या आमच्या सीएसआर असोसिएशनचा एक भाग म्हणून आज ग्रीन हायड्रोजन मायक्रो ग्रीड आणि बॅटरी इंजिनीअरिंग लॅबचे उद्घाटन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मला विश्वास आहे की ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने भारताचे हे पहिले पाऊल असेल.

आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट विभागाचे डीन, प्रा. महेश पंचाग्नुला म्हणाले की, आमच्या या अत्याधुनिक प्रयोगशाळा अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल दर्शवितात. ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड लॅब आणि बॅटरी इंजिनीअरिंग रिसर्च लॅब स्थापन करण्यासाठी आयआयटीएमला पाठिंबा दिल्याबद्दल मी इंडस टॉवर्स लिमिटेडचा आभारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here