रुडकी : शेतकऱ्यांनी यंदा आपल्या शेतांमध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या ऊस पिकांची लागवड केली आहे. या पिकांची वाढ चांगली व्हावी यासाठी पिकावरील विविध किड, रोगांना रोखण्यासाठी खते आणि किटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. अलिकडील काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर आता ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव सुरू झाला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊसावर किडीचा फैलाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याबाबत धनौरी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. पुरुषोत्तम यांनी सांगितले की, ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाला आळा घालण्यासाठी औषध फवारणी करावी. शेतकऱ्यांनी कॉपर क्लोराइड औषध दोन ते तीन ग्रॅम प्रमाणात एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. अशा औषध फवारणीने रोगाला रोखता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.