नवी दिल्ली : जून महिन्यात महागाईचा दर 3.18 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांतील हा सर्वात जास्त दर आहे. मे महिन्यात भाजीपाल्याचा दर 5.46 टक्क्यांवरून घसरून जूनमध्ये तो 4.66 टक्क्यांपर्यंत स्थिर झाला , असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अर्थशास्त्रज्ञ दीपती मॅथ्यू यांनी सांगितले.
किरकोळ चलनवाढ जून 2019 मध्ये वाढत राहिली आणि 3.18 टक्क्यांवर पोहोचली. जून 2018 मध्ये रिटेल चलनवाढीचा दर 4.92 टक्के होता आणि मे 2019 मध्ये 3.05 टक्के होता. सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस द्वारा जाहीर करण्यात आलेल्या सीपीआयच्या आकडेवारीनुसार अंडी, मांस आणि मासे यांसारख्या प्रथिने समृद्ध खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर जूनमध्ये जास्त होता. दरम्यान, मे महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक 3.1 टक्क्याने वाढून 133.6 वर आले. मागील वर्षीच्या याच कालावधीत एप्रिल ते मे 2019 या काळात एकूण वाढ 3.7 टक्के होती, असेही सीएसओने म्हंटले आहे. उद्योगांच्या बाबतीत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील 24 उद्योगातील 12 समूह मागील वर्षाच्या तुलनेत सकारात्मक वाढ दर्शवणारे ठरले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.