नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये किरकोळ महागाईचा दर ७ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणणे केंद्र सरकारसाठी एक आव्हान बनले आहे. सरकारकडून यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही महागाई नियंत्रणात आणणे कठीण बनले आहे. महागाईला आळा घालण्यासाठीच्या उपायांचा येत्या काही महिन्यांत परिणाम दिसून येईल, असा विश्वास अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला आहे. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर जुलै महिन्यात ६.७१ टक्के होता. तो ऑगस्ट महिन्यात ७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
इंडिया डॉट कॉमवरील वृत्तानुसार, सध्याच्या चलनवाढीमध्ये दरामध्ये अन्न आणि ऊर्जा उत्पादनांच्या किंमतींचा समावेश नाही. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर जुलै महिन्यात ६.७१ टक्क्यांवरून वाढून या महिन्यात सात टक्क्यांवर पोहोचला. अन्न आणि इंधनाच्या किमतीत झालेली वाढ हे यामागील कारण आहे. सरकारने मैदा, तांदूळ, मैदा इत्यादींच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीवर परिणाम होईल. दर कमी होऊ शकतात असे अर्थ मंत्रलायने म्हटले आहे. देशांतर्गत पुरवठा कायम राखण्यासाठी आणि किंमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारने गव्हाच्या तसेच तांदळाचे पीठ इत्यादींच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या उपायांचा येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम दिसेल अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली.